Home श्री बालोपासना श्री सिद्धिविनायक

* बालोपासना *



श्री गणपते। विघ्ननाशना।
मंगलमूरुते। मूषकवाहना।१।
तिमिर नाशिसी। निजज्ञान देउनि।
रक्षिसी सदा। सुभक्तांलागुनि।२। 
खड्ग दे मला। प्रेमरूपी हे।
मारिन षड़रिपु। दुष्ट दैत्य हे।३।
बालकापरी। जवळी घे मज।
ईश जगाचा तू। मी तव पदरज।४।
मनोहर तुझी। मूर्ति  पहावया।
लागी दिव्य दुष्टि। देई  मोरया।५। 
पुरवि हेतुला। करुनि करुणा। 
रमवी भजनी। कलिमलदहना।६।


आनंदलहरी :-
ज्ञानभास्करा शांतिसागरा, भक्तमनहरा मुकुंदा
परम उदारा भवभयहरा, रखमाईवरा सुखकंदा ||
पाप ताप  दुरितादि  हराया ,तूचि समर्थ यदुराया
म्हणोनि तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया ।।
कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो
श्यामसुंदरा सर्वकाळ मज, तुझे सगुण रूप दिसो।
तू माउली मी लेकरू देवा,तू स्वामी मी चाकरू
मी पान  तू तरुवरु देवा, तू धेनु मी वासरू ।।
तू पावन मी पतित देवातू दाता  मी याचक।
तू फूल  मी सुवास देवा, तू मालक मी सेवक ।।
तू गूळ  मी गोडी देवातू धनुष्य मी बाण
तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन  मी सहाण ।।
तू चंद्रमा मी चकोर देवा, मी कला तू पौर्णिमा
तुझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अगाध तुझा महिमा ।।
तू जल मी बर्फ देवा, तु सागर मी लहरी
तुजविण क्षण मज युगसम वाटोहेचि मागणे श्रीहरि ।।
वत्सा  गाय बाळा  माय, तेवी मजला  तू आई।
काया वाचा मने सदोदिततव पदी सेवा, मज देई ।।
ध्यास नसोंदे विषयांचा मज, तुझ्या पायी  मन सतत रमो।
दृढतरभावे तव गुण गाताकोठे माझे मन गमो।
अनंतरूपा एकोभावे, करितो अनंत नमस्कार |
दासपणाचे सुखसोहाळे, भोगवी प्रभो निरंतर
नको मजवरि राहू उदास धावत येई यदुराया ।।
तव दर्शनेविण दुजी आस, धावत येई यदुराया ।।



चोवीस नामावळी :-
केशवा, दे मजला विसावा। आलो शरण तुला ।१।
नारायणा, करी मजवरी करूणा। आलो शरण तुला ।२।
माधवा, चैन पडेना जीवा। आलो शरण तुला ।३।
गोविंदा, दे तव नाम छंदा। आलो शरण तुला ।४।
श्रीविष्णु,मी वत्स तू धेनु। आलो शरण तुला ।५।
मधुसूदना, वारि चित्तवेदना। आलो शरण तुला ।६।
त्रिविक्रमा,अगाध तुझा महिमा। आलो शरण तुला ।७।
वामना, पुरवी मनकामना। आलो शरण तुला ।८।
श्रीधरा, तुजविण नको पसारा। आलो शरण तुला ।९।
हृषिकेशा,तोडी वेगी भवपाशा। आलो शरण तुला ।१०।
पद्मनाभा, जगताचा तू गाभा। आलो शरण तुला ।११।
दामोदरा, चरणी देई थारा। आलो शरण तुला ।१२।
संकर्षणा, तू त्रैलोक्याचा राणा। आलो शरण तुला ।१३।
वासुदेवासतत देई मज सेवा। आलो शरण तुला ।१४।
प्रद्यम्ना, पाहि तुजविण आना। आलो शरण तुला ।१५।  
अनिरुद्धा, दे प्रेम भक्ति श्रद्धा। आलो शरण तुला ।१६।
पुरुषोत्तमा, भजनी दे मज प्रेमा। आलो शरण तुला ।१७।
अधोक्षजा, सत्य सखा तू माझा। आलो शरण तुला ।१८।
नरसिंहा, कृपा करिसि तू केव्हां। आलो शरण तुला ।१९।
अच्युता, तुजविण नाही त्राता। आलो शरण तुला ।२०।
जनार्दना,घे पदरी या दिना। आलो शरण तुला ।२१।
उपेंद्रा, घालवि आळस-निद्रा। आलो शरण तुला ।२२।
श्रीहरि, जन्ममरणाते वारी। आलो शरण तुला ।२३।
श्रीकृष्णा, घालवि माझी तृष्णा। आलो शरण तुला ।२४।
निरंजना, रुक्मिणीच्या जीवना  आलो शरण तुला ।२५।


गुरुपादुकाष्टक :-
दयावंत कृपावंत सद्गुरुराया। अनन्यभावे शरण आलो मी पाया
भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।१।
अनंत अपराधी मी सत्य आहे। म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे
तुजविण हे दुःख सांगू कुणासी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।२।
मतिहीन परदेशी मी एक आहे। तुजविण जगी कोणी प्रेमे पाहे
जननी जनक इष्ट बंधु तू मजसी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।३।
जगतपसारा दिसो सर्व वाव। अखंडीत तव पायी मज देई ठाव
विषापरि विषय वाटो मनासी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।४।
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे। तयासीच तू भेट देसी स्वभावे
म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।५।
किती दिवस गाऊ हे संसारगाणे। तुजविण कोण हे चुकविल पेणे
नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।६।
सुवार्णासी सोडुनी कांति राही। सुमनासी सोडी सुवास पाही।
तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।७।
कलावंत भगवंत अनंत देवा। मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा
कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।८।


यदुवीराष्टक :-
नमन करितो अनंता। सुमन वाहतो श्रीकांता
ठेवितो चरणावरी माथा। जय जय यदुवीर समर्था ।१।
त्रयभुवनाचा तू कंद। अससी सत-चित-आनंद
परि सगुण होउनि रमविसि भक्तां। जय जय यदुवीर समर्था ।२।
देवकीने तुज वाहिले। नंदराणीने पाळिले
तोषविली गोकुळिची जनता। जय जय यदुवीर समर्था ।३।
पुतनेचे विष शोषियेले। अघ-बक असुरा मारियले
करांगुळी गोवर्धन धरिता। जय जय यदुवीर समर्था ।४।
कालियावरी नाचसी। मंजुळ मुरली वाजविसी
यमुनातीरी धेनु चारिता। जय जय यदुवीर समर्था ।५।
गोपीसवे रास खेळसी। अक्रुरासह मथुरे जासी
गज आपटिला भूमिवरुता। जय जय यदुवीर समर्था ।६।
कंसाचे केले कंदन। राज्यी स्थापिला उग्रसेन।
सुख विलेसी तात-माता। जय जय यदुवीर समर्था ।७।
गुरूगृही काष्टे वाहिली। विप्रा सुवर्णपुरी दिधलि
भक्तांची कामना पुरविता। जय जय यदुवीर समर्था ।८।
अर्जुनासी कथिलि गीता। ती झाली सकलां माता
बोधने कलिमल हरिता। जय जय यदुवीर समर्था ।९।

पूजा :-
गिरिधर मी पूजणार आजी। यदुवीर मी पूजणार ।धृ. 
रत्नजडित सिंहासनी बसवुनी। झारीत घेउनि गुलाबपाणी ।।
प्रभुरायाचे मुख न्याहाळोनि। स्वकरे पाय धुणार ।१।
चंदनउटि लावुनि अंगाला। नेसवुनी पीतांबर पिवळा ।।
अंगावरि भरजरी लाल शेला। पांघराया देणार ।२।
जाई जुई मोगरा मालती। चाफा बकुळी सुगंधि शेवंती ।।
दवणा मरवा तुळस वैजयंती। गुंफुनि हार करणार ।३।
कपाळी लावुनि कस्तुरिटिळा। सुमनहार घालुनि गळां ।।
हास्यवदन घनश्याम सांवळा। डोळेभर पहाणार ।४।
धूप घालुनि दीप लाविन। दूधफळाते प्रेमे अर्पिन ।।
मंगलारती ओवाळून। प्रभुचे गुण गाणार ।५।
परमपावना रुक्मिणीजीवना। निशिदिनी करी रत तव गुणगाना ।।
ऐसे भावे करुनि प्रार्थना। पदी मस्तक ठेवणार ।६।
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे। तव चरणकमली मन हे निजू दे
तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया। नमस्कार माझा तुला यदुराया ।।

आरती :- ()
जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकींच्या ताता।
आरती ओवाळीता। हरली घोर भवचिंता ।धृ.।।
धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला।
धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला।
धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला ।।
धन्य  ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा ।१।
धन्य ती नंदयशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला
धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला
धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा ।।
धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता।२। 
आरती :- ()
ओवाळू आरती माता कलावती। पाहता तुझी मूर्ति मनकामनापुर्ती ।धृ.
भावे वंदिता तव दिव्य पाउले। संसारापासुनि माझे मन भंगले ।।
तुझ्या भजनी नित चित्त रंगले। झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ।१।
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर। दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ।।
भाषणे सकल संशय जाती दूर। विशालाक्ष मज दे गुणवंती ।२।

विज्ञापना :-
हे विश्वजनका, विश्वंभरा,विश्वपालका,विश्वेश्वरा !
माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा,भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ  शांति मला दे .
 हे कमलनयना,  कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे.
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया!
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा,गुरुमूर्ते,गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.

।।श्री गोपालकृष्ण महाराज की जय ।।

No comments:

Post a Comment