श्रीगणपतीस्त्रोत्र
जयजयाजी गणपति ||मज द्यावी विपुल मति ||
करावया तुमची स्तुति ||स्फूर्ति द्यावी मज अपार || १ ||
तुझे नाम मंगलमूर्ति ||तुज इंद्र चंद्र ध्याती ||
विष्णु शंकर तुज पूजिती ||अव्यया ध्याती नित्यकाळी || २ ||

तुजे नाव विनायक ||गजवदना तू मंगलदायक ||
सकळ विघ्ने कलिमदाहक ||नामस्मरणे भस्म होती || ३ ||

मी तव चरणांचा अंकित ||तव चरणा माझे प्रणिपात ||
देवाधीदेव तू एकदंत ||परीसें विज्ञापना एक माझी || ४ ||

माझा लडीवाळ तुज करणे ||सर्वांपरी तू मज सांभाळणे ||
संकटामाझारी रक्षिणे ||सर्व करणे तुज स्वामी || ५ ||

गौरीपुत्रा तू गणपती ||परीसावी सेवकाची विनंती ||
मी तुमचा अनन्यार्थी ||रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया || ६ ||

तूंच माझा बाप माय ||तूंच माझा देवराय ||
तूंच माझी करीशी सोय ||अनाथनाथा गणपती || ७ ||

गजवदना श्रीलंबोदरा ||सिध्दिविनायका भालचंद्रां ||
हेरंबा हे शिवपुत्रा ||विघ्नेश्वरा अनाथबंधू || ८ ||

भक्तपालका करी करुणा ||वरदमूर्ती गजानना ||
परशुहस्ता सिंदूरवर्णा ||विघ्ननाशना मंगलमूर्ती || ९ ||

विश्ववदना विघ्नेश्वरा ||मंगलाधीशा परशुधरा ||
पापमोचना सर्वेश्वरा ||दिनबंधू नाम तुझे || १० ||

नमन माझे श्रीगणनाथा ||नमन माझे विघ्नहर्ता ||
नमन माझे एकदंता ||दीनबंधू नमन माझे || ११ ||

नमन माझे शंभूतनया ||नमन माझे करुणालया ||
नमन माझे गणराया ||तुज स्वामिया नमन माझे || १२ ||

नमन माझे देवराया ||नमन माझे गौरीतनया ||
भालचंद्रा मोरया ||तुझे चरणी नमन माझे || १३ ||

नाही आशा स्तुतीचि ||आशा तव भक्तीची ||
सर्वप्रकारे तुझिया दर्शनाची ||आशा मनी उपजली || १४ ||

मी मूढ केवळ अज्ञान ||ध्यानी तुझे सदा चरण ||
लंबोदरा मज देई दर्शन ||कृपा करी जगदिशा || १५ ||

मतिमंद मी बालक ||तूंचि सर्वांचा चालक ||
भक्तजणांचा पालक ||गजमुखां तू होशी || १६ ||

मी दरिद्री अभागी स्वामी ||चित्त जडावे तुझिया नामी ||
अनन्य शरण तुजला मी ||दर्शन देई कृपाळुवा || १७ ||

हे गणपती स्त्रोत्र जो करी पठण ||त्यासी स्वामी देईल अपार धन ||
विद्या सिद्धीचे अगाध ज्ञान ||सिंदूरवदन देईल पै || १८ ||

त्यासी पिशाच्च भूत प्रेत ||न बाधिती कदाकाळांत ||
स्वामींची पूजा करोनी यथास्थित ||स्तुतीस्त्रोत्र हे जपावे || १९ ||

होईल सिद्धी षण्मास हे जपता ||नव्हे कदा असत्य वार्ता ||
गणपती चरणी माथा दिवाकरे ठेविला || २० ||
गणपती चरणी माथा दिवाकरे ठेविला || २० ||
इति श्रीगणपतीस्त्रोत्र संपूर्णम ||
No comments:
Post a Comment